Yogesh Ramdas Kadam Minister

 




पोलीस पाटील संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीत पोलीस पाटील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलीस पाटलांचे मानधन वेळेवर देणे, पोलीस पाटलांना लावल्या जाणाऱ्या वाळू डूट्या रद्द करणे, प्रवास भत्ता दुप्पट करणे, अनुकंप कायदा लागू करणे, सेवा निवृत्तीनंतर एक रकमी 20 लाख रुपये देणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि त्यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.  

🗓️ ९ मार्च २०२६ |📍मंत्रालय, मुंबई

Shivsena - शिवसेना

#YogeshKadam #Shivsena #PolicePatilAssociation #महाराष्ट्रपोलीस #महत्त्वपूर्ण_बैठक

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

NEET NTA

Kamlakar Shenoy BMC news