Yogesh Ramdas Kadam Minister



 बृहन्मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरुपी मालकी हक्काची निवासस्थाने उपलब्ध करून देणे तसेच दंडनीय अनुज्ञप्ती शुल्काबाबत आज मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या प्रश्नावर सखोल आढावा घेण्यात आला. 


राज्याच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाला योग्य आणि स्थिर निवासव्यवस्था मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवर असलेल्या दंडनीय अनुज्ञप्ती शुल्काच्या विषयावरही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याबाबतच्या अडचणी समजून घेतल्या. पोलीस दलाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना यावेळी दिल्या.


पोलीस दलाचे मनोबल अधिक बळकट व्हावे आणि त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.


🗓️ ९ मार्च २०२६ |📍मंत्रालय, मुंबई


Shivsena - शिवसेना 


#YogeshKadam  #Shivsena #MumbaiPolice  #PoliceHousing #PublicSafety

Comments

Popular posts from this blog

Madhu Palace Guest House Kamati pura 12 Lane

NEET NTA

Kamlakar Shenoy BMC news